Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

आकुर्डी, डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या पार्थ काटे याची चमकदार कामगिरी

शिक्षण विश्व: उल्लेखनीय यशामुळे पार्थची झोनल स्पर्धेसाठी निवड

पिंपरी चिंचवड  :आकुर्डी, डी. वाय. पाटील महाविद्यालयातील बीटेक सिव्हिल शाखेतील विद्यार्थी पार्थ काटे याने शारदाबाई आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, शारदानगर, बारामती येथे पार पडलेल्या एसपीपीयू आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

पार्थने २०० मीटर बॅकस्ट्रोक – सुवर्ण पदक, ८०० मीटर फ्रीस्टाईल – सुवर्ण पदक, २०० मीटर मेडली मध्ये कांस्य पदक पटकाविले.

हेही वाचा –  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार

या उल्लेखनीय यशामुळे पार्थची झोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही संपूर्ण महाविद्यालयासाठी आणि क्रीडा विभागासाठी अत्यंत अभिमानाची बाब असे विश्वस्त तेजस पाटील , कॅम्पस डायरेक्टर रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), प्राचार्य डॉ. पी. माला‍थी, डीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डॉ. एस. एस. सरनोबत, क्रीडा संचालक प्रा. आबाजी माने यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button