Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

कुरुक्षेत्र २०२५’ तरुणांसाठी प्रभावी व्यासपीठ: डॉ. बी. बी. वाफारे

शिक्षण विश्व: कुरुक्षेत्र २०२५ हॅॅकेथॉन माईर्स एमआयटी महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड :‘कुरुक्षेत्र २०२५’ ही केवळ कोडिंग स्पर्धा न राहता, तरुणांना सर्जनशीलता, सहकार्य आणि समाजाभिमुख नवोन्मेषासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे असे मत माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी सांगितले.

माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘कुरुक्षेत्र २०२५ – द युग ऑफ इनोव्हेशन’ या राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांच्या हॅॅकेथॉन स्पर्धेचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. मोजिला एमआयटी एसीएससी क्लब आणि इन्स्टिट्युशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या हॅकफेस्टला देशभरातील तरुण तंत्रज्ञांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत एकूण १४९ संघांनी सहभाग नोंदवला असून १०० हून अधिक महाविद्यालये व विद्यापीठांचे प्रतिनिधित्व झाले. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा यांसारख्या राज्यांतील अभियांत्रिकी, विज्ञान, व्यवस्थापन आणि पॉलिटेक्निक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या स्पर्धेत पाहायला मिळाला. एआय, डेटा सायन्स, एजंटिक एआय, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन आणि ओपन इनोव्हेशन या प्रगत तंत्रज्ञान विषयांवर विद्यार्थ्यांनी नवनवीन उपाययोजना सादर केल्या.

हेही वाचा : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं; मनोज जरांगे पाटील आक्रमक, ५ कोटी मराठ्यांसह मुंबईत धडक देण्याचा इशारा

या हॅॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये एमआयटी-एडीटी विद्यापीठ, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एआयएसएसएमएस आयओआयटी व सीओई, जी. एच. रायसोनी ग्रुप ऑफ कॉलेजेस, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, संदिप युनिव्हर्सिटी नाशिक, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर, संजीवनी युनिव्हर्सिटी कोपरगाव, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, भारती विद्यापीठ पुणे व सोलापूर, साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी नवी मुंबई, लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय नवी मुंबई, ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट जबलपूर, ओरिएंटल इन्स्टिट्यूट भोपाळ, सीएमआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तेलंगणा, संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर यांचा समावेश होता.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच प्रा. अभिजित नेटके, प्रा. मंदार प्रळेले, प्रा. शर्मिली मोरे आणि संपूर्ण प्राध्यापक वर्गाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच आयोजक समिती व विद्यार्थी स्वयंसेवकांचे अथक परिश्रम यामुळे या उपक्रमाला विशेष यश प्राप्त झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group