Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Breaking News: महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची मंजुरी

मिशन महापालिका: पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिली असून, सदर प्रारूप अधिसूचना आज जाहीर करण्यात आली. दरम्यान नागरिकांना 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

प्रारूप अधिसूचनेची प्रसिद्धी पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात करण्यात आले आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि इतर संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सदर प्रारूप प्रभाग रचना ही केवळ प्रस्तावित असून, अंतिम रचना हरकती व सूचनांच्या तपासणीनंतरच निश्चित केली जाणार आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी आपल्या प्रभागातील संभाव्य बदलांची सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि जर काही आक्षेप किंवा सूचना असतील, तर त्या लेखी स्वरूपात ठरवून दिलेल्या कालमर्यादेत सादर कराव्यात. यानंतर आयोगाकडून या सूचना विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल.

दि. 4 सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार

प्रारूप प्रभाग रचनेसाठी नागरिकांना 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे.
5 ते 12 सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी होणार आहे. 13 ते 15 सप्टेंबर सुधारणा सह अंतिम प्रभाग रचना सादर करणार असून, 3 ते 6 अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणूक अधिसूचनेतील महत्त्वाचे मुद्दे:

  1.  प्रारूप प्रभाग रचना आजपासून प्रसिद्ध

  2. 4 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी

  3. महापालिकेच्या संकेतस्थळावर व मुख्य कार्यालयात अधिसूचना उपलब्ध

  4. नागरिक, संस्था व राजकीय पक्षांना हरकती नोंदविण्याची संधी

  5. अंतिम प्रभाग रचना हरकतींच्या अन्वयार्थ निश्चित केली जाणार

महापालिकेचे आवाहन:

“महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या प्रारूप प्रभाग रचनेचा सखोल अभ्यास करावा. आपल्या परिसरातील संभाव्य बदल समजून घ्यावेत व आवश्यक असल्यास आपल्या हरकती लेखी स्वरूपात महापालिकेकडे सादर करावीत,” असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
३२ प्रभाग : पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण ३२ प्रभाग असतील.
४ सदस्यीय प्रभाग : प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले जातील.
१२८ जागा : या रचनेत एकूण १२८ जागा उपलब्ध होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group