Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यात महापालिका निवडणुकांची लगबग; 29 महापालिकांसाठी प्रारुप प्रभाग रचना अंतिम

मिशन महानगरपालिका: डिसेंबरमध्ये मतदान, जानेवारीत नवे महापौर पदस्थापना होणार!

पिंपरी-चिंचवड : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून प्रारुप प्रभाग रचना राज्य सरकारने अंतिम करून निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यामुळे राज्यभर महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

2021 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत अधिसूचना काढून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली. त्याअंतर्गत प्रारुप प्रभाग रचना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.

प्रारुप प्रभाग रचनेची पुढील प्रक्रिया:

  • 22 ते 25 ऑगस्टदरम्यान: प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्याचे वेळापत्रक

  • त्यानंतर 15 दिवस: नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार.

  • नंतरच्या 10 दिवसांत: सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.

  • त्यानंतर प्रभागांमध्ये आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडेल.

  • निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

मतदान आणि निकाल:

  • 20 ते 25 डिसेंबर 2025: दरम्यान मतदान होण्याची शक्यता.

  • जानेवारी 2026: नव्या महापौरांची नियुक्ती अपेक्षित.

राज्यातील इच्छुक उमेदवारांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल.

निवडणूक प्रारुप प्रभाग रचना तयार करुन राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवली आहे. शासनाच्या वेळापत्रकाप्रमाणे दि. 22 ऑगस्टरोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे आदेश मिळाले की, शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्यालय येथे प्रभाग प्रसिद्ध केले जाणार आहेत.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button