ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देवकर प्लाझा फसवणूक प्रकरण : ५४.५० लाख रुपयांची फसवणूक

दोन आरोपींवर गुन्हा दाखल : रावेत येथील प्रकारामुळे परिसरात चर्चा

पिंपरी-चिंचवड | रावेत परिसरात एका नामांकित इमारतीच्या नावावर मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी देवकर प्लाझा प्रकरणात दोन व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी फिर्यादी विशाल लक्ष्मण ओव्हाळ (वय ३२, रा. वाकड पोलीस वसाहत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३५ वाजता तक्रार दाखल केली.

फसवणुकीचा प्रकार कसा घडला?

तक्रारीनुसार, जुलै २०१९ ते आजपर्यंत च्या कालावधीत, आरोपी अनिल दत्तात्रय देवकर व सौ. कुमोद अनिल देवकर (रा. प्लॉट नं. ०५, सेक्टर नं. २७, निगडी प्राधिकरण, पुणे) यांनी संगनमत करून देवकर प्लाझा (सर्वे नं. १०५/३, म्हस्के वस्ती, रावेत) या इमारतीतील फ्लॅट विक्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करत फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडून ५४.५० लाख रुपये घेतले. ही रक्कम धनादेश व आरटीजीएसद्वारे स्वीकारली गेली. मात्र, त्यानंतर फ्लॅटचे बांधकाम पूर्ण न करता, ताबाही न देता, संबंधितांनी फसवणूक केली. फिर्यादीसह त्यांचे मित्र अनिल जगताप व जावेद मुजावर यांनाही या फसवणुकीचा फटका बसला.

हेही वाचा     :      “कृष्ण विरुद्ध सुदर्शन: उपराष्ट्रपतीपदाची दक्षिणात्य लढत” 

फसवणुकीनंतर धमक्या देखील दिल्या?

तक्रारीत असा आरोप आहे की, आरोपींनी घेतलेली रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली असून, तक्रार दिल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मित्रांना धमकावलेही गेले. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या बी.एन.एस. २०२३ मधील कलम ३१८ (४), ३१६ (२), ३५१ (२), तसेच ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी अद्याप अटकेत नसून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुंभार, रावेत पोलीस ठाणे हे करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button