संत साई शाळेचे विद्यार्थी भारत मातेसमोर नतमस्तक
शिक्षण विश्व : संत साई इंग्लिश शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल भोसरी ,आदिनाथ नगर या ठिकाणी ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर, शिक्षक पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करून ,भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून औक्षण करण्यात आले.
अध्यक्ष व विदर्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होत असताना सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. शाळेतील विद्यार्थिनी अरहमा अन्सारी व विद्यार्थी नील विभूती यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे सादर केली.शिक्षिका प्रगती कोतुळे यांनी स्वतंत्रता संग्रमाची माहिती सांगितली. दरम्यान दरवर्षी सीमेवर लढत असणाऱ्या जवानांसाठी एक हात मदतीचा म्हणून “आर्मी फंड “संस्थेतर्फे देण्यात येतो. आतापर्यंत संस्थेतर्फे सहा लाखाचा निधी आर्मी फंडच्या खात्यात जमा केले आहेत असे ढवळेश्वर यांनी सांगितले.
हेही वाचा : जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मनोज वाबळे, काशिनाथ कत्तनळी, प्रमोद शिंदे, संजय अनार्थे ,अक्षय राणे यांनी विशेष मेहनत घेतली.स्वाती मोघे , कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त पायल ढवळेश्वर, भारती ढवळेश्वर , उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम इतर सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक पालक प्रतिनिधी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गौरी बैरागी हिने केले . वंदे मातरम गीत आणि कार्यक्रमाची सांगता झाली.





