Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमी

ICICI बँकेनंतर HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का, खात्यात ठेवावा लागणार तब्बल ‘इतका’ मिनिमम बॅलेंस

HDFC Bank Increase Minimum Balance Limit | आयसीआयसीआय बँकेपाठोपाठ आता एचडीएफसी बँकेनेही आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. दोन्ही प्रमुख खाजगी बँकांनी बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. हे नवीन नियम 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन बचत खाते उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना लागू झाले आहेत.

एचडीएफसी बँकेमध्ये आतापर्यंत बचत खात्यात किमान 10,000 रुपये ठेवावे लागत होते. पण 1 ऑगस्ट 2025 नंतर नवीन खाते उघडणाऱ्या ग्राहकांना ही मर्यादा वाढवून 25,000 रुपये करण्यात आली आहे. जर खात्यात यापेक्षा कमी रक्कम असेल तर बँक शुल्क आकारेल. हा नियम सर्व प्रमुख महानगरे आणि शहरी भागांमध्ये लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा     :      भोसरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेनेही मोठी वाढ केली आहे. या बँकेत आता नवीन बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील. पूर्वी ही मर्यादा 10,000 रुपये होती. म्हणजेच आयसीआयसीआय बँकेने ही मर्यादा तब्बल 5 पटीने वाढवली आहे. जुन्या ग्राहकांसाठी सध्याचे नियम तसेच राहतील जोपर्यंत बँक त्यांना स्वतंत्रपणे माहिती देत नाही.

पगार खात्यांवर किंवा शून्य बॅलन्स खात्यांवर (BSBDA) या नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. एकीकडे अनेक सरकारी बँका किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द करत आहेत, तर दुसरीकडे खाजगी बँकांनी ही मर्यादा वाढवल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button