आता, पापाचा भरलाय घडा, ट्रम्पना शिकवू चांगलाच धडा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रोजची वक्तव्ये आणि त्यांनी मारलेल्या कोलांटउड्या पाहिल्या, की हा माणूस अतिशय बुद्धीवंत करी असावा किंवा बिनडोक असावा, अशी शंका मनात येऊन जाते. पण, गेल्या काही दिवसात त्यांनी पाकिस्तानला दिलेले झुकते माप आणि भारताबाबत ओकलेली गरळ पाहता त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे मानायला मुळीच हरकत नाही !
२५ टक्के कर आकारणी..
भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. दि. १ ऑगस्टपासून हे दर लागू होतील, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले होते. मात्र, शुक्रवारी हा निर्णय एक आठवड्यासाठी त्यांनी मागे घेतला आहे. कदाचित हा निर्णय रद्दही होण्याची शक्यता आहे. त्यावेळी त्यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याबद्दल अतिरिक्त दंड लादण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचे वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे.
प्रत्येक देशाचे दररोज जाहीर केले..
युक्रेनसोबत रशियाने दि. ७ ऑगस्टपूर्वी शस्त्रसंधी केली नाही, रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्यांवर १०० टक्के दराने अतिरिक्त कर लादण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला आहे. जपान आणि युरोपियन महासंघावर १५ टक्के, फिलिपिन्स आणि इंडोनेशियावर १९ टक्के, बांगलादेशावर ३५ टक्के, थायलंडवर ३६ टक्के आणि मलेशियावर २५ टक्के दराने कर लादण्याचा निर्णय अमेरिकने जाहीर केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे निर्णय किती दिवस टिकणार हे दि. ७ ऑगस्ट नंतर कळेल. मात्र ते तसे राहतील असे सध्या तरी वाटत नाही.
प्रत्येकाशी भांडण कशासाठी?
अमेरिका हे ताकदवान राष्ट्र समजले जाते. मात्र,जगातील सगळ्यांशी भांडण करून आपली ताकद वाया घालवणे, अमेरिकेतील मंडळींना परवडणारे नाही. अमेरिकेला चीनसह अनेक देशांवर अनेक बाबींसाठी अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व आयात शुल्क वाढवून कमी करता येणार नाही, याची जाणीव झाली, की त्यांचे निर्णय मागे घेतले जातात. त्यांच्या या लहरी स्वभावाची ओळख आता जगाला व्हायला लागली आहे. अर्थात् आपली देशातील विरोधी पक्षाला अजून झाली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल !
लहरी आणि अनाकलनीय वागणे..
भारताच्या बाबतीत तर डोनाल्ड ट्रम्प यांचे वागणे केवळ लहरी , अनाकलनीय आणि वेडसरपणाची झाक असणारे आहे. युद्ध भारत – पाकिस्तन मध्ये.. विषय दहशदवादाचा.. पाकला युद्ध डोईजड जाते, हे समजल्यावर त्यांनी, त्यांच्या लष्कर यंत्रणेने युद्ध थांबवण्याची विनंती केली. भारतालाही जीवित, आर्थिक हानीमुळे युद्ध मनापासून नको होते. पाकची विनंती आपण स्वीकारली, मात्र या पुढे दहशदवादी हल्ला पाकचे युद्ध समजून उत्तर दिले जाईल, हे स्पष्ट शब्दात धमकावले.
नको तिथे नाक खुपसणे..
युद्ध थांबते हे पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपणच हे युद्ध थांबविल्याचा दावा केला. एकदा नाही २९ वेळा त्यांनी हा दावा केला आणि नाक खुपसले आहे. भारताच्या लष्करासह पंतप्रधांनी गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला. पण त्यातून ते काहीही अक्कल शिकलेले नाहीत.
हेही वाचा – “…म्हणून मंत्री बोर्डीकरांनी अधिकाऱ्याला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली”, VIDEO शेअर करत रोहित पवारांची टीका
‘ट्रम्प इज अ लायर..!’
पाकने अमेरिकेचा युद्ध थांबवण्यात सम्बन्ध नाही, हे वारंवार सांगितले. मात्र, आपल्या देशातील विरोधी पक्षाला ‘ए ट्रम्प यु आर लायर ‘ या वाक्यात मोदींनी दिलेले उत्तर ऐकायचे होते. त्यापुढे जाऊन ट्रम्प यांनी पाकशी खनिज तेल संबंधात केलेला करार,२५ टक्के आयात शुल्क हा आपल्या देशाला दिलेला दणका आहे, असे सांगायला देशातील विरोधकांनी सुरुवात केली. आता, युद्ध थांबावे हे पाकचे म्हणणे होते. ट्रम्पनी मोदींना फोन केला नव्हता. मोदींनी अमेरिकेच्या उपाध्यक्षाला युद्ध सुरु राहणार हे ठणकावून सांगितले होते. भारत अमेरिकेकडे गेला नव्हता. पाक अमेरिकेकडे गेल्याची शक्यता जास्त आहे. पाकचे खनिज तेल मिळवण्यासाठी अमेरिकेने हा खटाटोप केल्याची शक्यता जास्त आहे. युद्ध भर विजयापर्यंत झाले असते, तर पाकबरोबर अमेरिकेला वाटाघाटी करता आल्या नसत्या हा धोका होता, हे भारताच्या केव्हाच लक्षात आले आहे.
कदाचित ट्रम्प यांनाच कॉन्ट्रॅक्ट
कदाचित, ट्रम्प यांच्या कंपनीलाच पेट्रोल काढण्याचे कंत्राट मिळणार असेल आणि तीन तीन ठिकाणी युद्ध थांबवल्याचे श्रेय घेत शांततेचे नोबेल मिळवण्याचा त्यांना घाट असेल..हा घाट भारताने उधळला म्हणून ट्रम्प बिथरले आणि विस्कटले आहेत. विषय भारत पाकिस्तानचा.. पण, ट्रम्प यांना मिरवून घ्यायचे होते, हे तर बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना..असेच आहे.
भारताची पावले सावध हवीत !
डोनाल्ड ट्रम्प हा अत्यंत भंपक माणूस आहे हे संपूर्ण जगाच्या लक्षात आले आहे, नरेंद्र मोदी यांच्या तर नक्की आले असणार ! भारत आणि अमेरिकेतील पूर्वीचे संबंध वेगळे..आणि आत्ताचे वेगळे हे लक्षात घेऊन भारताने पावले टाकायला हवीत! भारताचा वापर हा फक्त स्वार्थासाठी करायचा एवढाच चंग ट्रम्प यांनी बांधलेला दिसतो. अर्थात त्यांच्या या मनसुब्याला सुरुंग लावण्याचे काम भारताने केले पाहिजे आणि वेळीच सावध पावले उचलायला हवीत, हे निश्चित!





