तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ; मंत्रोपचाराने देवीची शक्ती काढल्याचा खबळजनक दावा

मुंबई : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीची शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप केला आहे. तसेच मंत्रोपचाराने तुळजाभवानी देवीच्या आठ आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा खळबळजनक दावा ही पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्यामार्फत पूजा करून शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्याचा पुजाऱ्यांचा दावा आहे. तसेच होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती ही तलवारीमध्ये काढून घेतल्याचे मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – अणुबॉम्ब असेल तर ताबडतोब स्फोट करावा; राजनाथ सिंह यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
श्री तुळजाभवानीच्या खजिना खोलीतील गायब झालेली तलवार तात्काळ तुळजाभवानीच्या जवळ आणून ठेवण्याची पुजाऱ्यांची मागणी असताना तलवारी बाबत माहिती घेऊन सांगतो म्हणत मंदिर संस्थानने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता मंदिर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





