Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Malegaon Bomb Blast | मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा निकाल आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने सुनावला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज सर्व सात आरोपींची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याची सुनावणी गेल्या १७ वर्षांपासून सुरू होती आणि आज अखेर निकाल जाहीर झाला.

या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत.

हेही वाचा   :    लाडक्या बहिणींनो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? 

सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची चौकशी केली, त्यापैकी 37 जण जबाबावरून फिरले. प्रकरणाचा तपास प्रथम एटीएस आणि नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला होता. यूएपीएच्या कलम 16 (दहशतवादी कृत्ये) आणि 18 (दहशतवादी षडयंत्र रचणं), आयपीएसच्या कलम 120 बी (गुन्हेगारी षडयंत्र), 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 324 (दुखापत करणे) आणि 153 ए (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) या कलमांतर्गत आरोप निश्चिती झाली आहे.

मालेगावचा बॉम्बस्फोट प्रकरण काय?

२००८ रोजी मालेगाव येथे मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या प्रकरणात भाजप नेत्या आणि माजी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य पाच जणांवर स्फोटाचा कट रचल्याचा आरोप होता. हा खटला २०१८ मध्ये सुरू झाला असून, १९ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button