शिक्षण विश्व: विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलसाठी अभिमानाचा क्षण!
ग्रेड ५ चा विद्यार्थी अन्वय नाईकुडे याने दिल्लीत झालेल्या आंतरशाळा वॉल क्लायम्बिंग स्पर्धेत पटकावले कांस्य पदक!

पिंपरी-चिंचवड : विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलसाठी एक अत्यंत आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे! शाळेचा पाचवीतील विद्यार्थी अन्वय नाईकुडे याने २८ जुलै २०२५ रोजी दिल्लीत पार पडलेल्या आंतरशाळा वॉल क्लायम्बिंग स्पर्धेत आपले उत्कृष्ट कौशल्य, धैर्य आणि जिद्द दाखवत कांस्य पदक (तृतीय क्रमांक) पटकावला आहे.
ही स्पर्धा Under-10 (१० वर्षाखालील) वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध शाळांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये अन्वयने आपल्या दमदार कामगिरीने वेगळी छाप पाडली. त्याची चपळता, समतोल आणि चिकाटी यामुळे तो या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
हेही वाचा – ‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार

शाळेच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने अन्वयचे अभिनंदन करण्यात आले. “अन्वयचा हा यशस्वी प्रवास केवळ त्याच्या मेहनतीचा नव्हे, तर आमच्या शाळेच्या खेळ व सहशालेय उपक्रमांवरील भराचाही पुरावा आहे,” असे मत शाळेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलचा अभिमान – अभिनंदन अन्वय!
तुझ्या या उत्तुंग यशाबद्दल संपूर्ण शाळा तुझ्यावर गर्व करते. भविष्यात तू आणखी उंच भरारी घेशील, अशी आम्हाला खात्री आहे! अन्वय नाईकुडे – तू आमच्या शाळेचा प्रकाशझोत आहेस! अशा शब्दांत शाळेच्या शिक्षकांनी नाईकुडे याचे कौतुक केले आहे.




