Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाटघर धरण ९५% तर निरा देवघर ८५% भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे :  पुणे पाटबंधारे विभागाने आज (दि. २६) भाटघर आणि निरा देवघर धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याची माहिती दिली आहे. संध्याकाळी ५:०० वाजता भाटघर धरण ९५% तर निरा देवघर धरण ८४.५३% भरले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार या धरणांमधून पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीच्या पात्रात सुरू असलेली बांधकामे, साहित्य आणि कामगारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच, नदीकाठावरील सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  ‘गदारोळामुळे विरोधकांचीच भूमिका कमकुवत होते’; मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीसाठी नदीपात्रात असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाने सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button