Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संत साई शाळेत ‘स्टडी स्ट्रेस असेसमेंट टेस्ट’चा यशस्वी उपक्रम

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी संत साई शाळा व मनशक्ती प्रयोग केंद्र यांचा संयुक्त उपक्रम

पिंपरी-चिंचवड | विद्यार्थ्यांच्या अभ्यासजन्य ताणाचे मूल्यमापन करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, भोसरी आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्ट्रेस असेसमेंट टेस्ट’ आयोजित करण्यात आली.

या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा मेंदू आणि मन यांवर अभ्यास करताना होणाऱ्या ताणाचा, चंचलतेचा, एकाग्रतेच्या अभावाचा, निर्णय क्षमतेच्या मर्यादेचा सखोल अभ्यास करण्यात आला. रंग, आकृती, अक्षरे, अंक यांच्यावर आधारित चाचण्या आणि विशिष्ट यंत्राद्वारे मेंदूची कार्यक्षमता तपासण्यात आली.

यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचाही सक्रिय सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर आधारित संगणकीय निकाल तयार करून मनशक्ती केंद्रातील तज्ज्ञ साधकांनी वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले. एकाग्रता, सकारात्मकता, वाचनाची सवय, आणि कृतज्ञता यांसारख्या गुणांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यासाठी विशेष पुस्तके आणि ध्यानवर्धक वस्तूंची सुविधा सशुल्क उपलब्ध करून देण्यात आली.

हेही वाचा     :      रुग्णालयांनी गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा प्रभावीपणे लाभ द्यावा; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशआबिटकर

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे आगर” याची प्रचिती या उपक्रमातून आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवलिंगजी ढवळेश्वर, सौ. सुनिता ढवळेश्वर मॅडम, संचालिका पायल ढवळेश्वर मॅडम, सौ. भारती ढवळेश्वर, श्री. मनोज वाबळे सर, तसेच मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा येथील श्री. अजित फापाळे, श्री. गीतेश कुलकर्णी, सौ. क्रांती गुधाटे, श्री. सतीश तोडमल, श्री प्रमोद अनिल शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

“जन्मदाते हो, संस्कारदाते व्हा”…

या उपक्रमांतर्गत पालकांना त्यांच्या मुलांच्या दिनचर्येविषयी माहिती विचारून समुपदेशन करण्यात आले. स्थिर मन ही यशाची गुरुकिल्ली आहे, हे सांगत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मानसिकदृष्ट्या सशक्त बनवण्यावर भर देण्यात आला. संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल हे केवळ ज्ञानदानाचे नव्हे, तर संस्कारांचेही केंद्र असून, “जागो पालक जागो”, “जन्मदाते हो, संस्कारदाते व्हा”, “Save your child from yourself” अशा घोषणांतून पालकांना सजग केले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button