Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

रुग्णालयांनी गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा प्रभावीपणे लाभ द्यावा; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशआबिटकर

यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठक

पुणे | धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा (#MPJAY ) गरजू रुग्णांना प्रभावीपणे लाभ घेण्याकरिता पुढाकार घ्यावा, या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयानी नोंदणी करुन घ्यावी, याकामी राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ.प्रशांत वाडीकर ,जिल्हा शल्यचिसक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. आबिटकर म्हणाले, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या योजना आहे. धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालये नोंदणीकृत असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आजारपणाच्या काळात सकारात्मक मदत देण्याची भावना ठेवावी. त्यांना सेवा करण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.

धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करुन द्याव्यात.

हेही वाचा     :      पिंपरी-चिंचवड शहरात एकदाही कर न भरलेले ३४ हजार २२ मालमत्ताधारक!

पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या तसेच वैद्यकीय उपचाराकरिता येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, सेवा दिल्यानंतर रुग्णाच्या अंगी रुग्णालयाप्रती समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

डॉ. शेटे म्हणाले, शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयाने पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावे, याकामात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावी, असेही डॉ. शेटे म्हणाले.

राज्य कामगार विमा रुग्णालय मोहननगर ची पहाणी

पिंपरी चिंचवड मोहन नगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषधी भंडार, आहार विभाग, यांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रुग्णांशीही संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डॉक्टर व प्रशासन यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात अश्या सूचना यांनी या वेळी केल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button