‘राज्याचे पुढील अधिवेशन ८ डिसेंबर रोजी नागपुरात’; अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि. १८) राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास कामकाज
विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास ४८ मिनिट कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९०.२० टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.२३ टक्के इतकी होती.
हेही वाचा – विधानसभा पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांची दमदार कामगिरी
विधानसभेत पुर्न:स्थापित १४ शासकीय विधेयके मांडण्यात आली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५ असून ५ सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. अशी माहिती देत या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.




