Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

संत साई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मन:शक्ती प्रणीत ‘होमहवन’ उत्साहात

शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड : संत साई इंग्लिश मिडियम स्कूल, भोसरी येथे पारंपरिक पद्धतीने आणि चैतन्यमय वातावरणात मन:शक्ती प्रणीत होमहवन विधी संपन्न झाला. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याला विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या वेळी आदरणीय गुरुवर्य श्री. संदान महाराज यांच्या मधाळ, प्रेमळ आणि सुस्पष्ट मंत्रोच्चारांनी वातावरणात अध्यात्मिक उर्जा संचारली. श्री गणेश, अग्निदेवता आणि विष्णुदेवतेचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले. महाराजांनी विविध पवित्र मंत्रोच्चार, जप, सात्विक ऊर्जा आणि भूमी शांती याच्या माध्यमातून संपूर्ण परिसर पावन केला.

कार्यक्रमात बोलताना महाराजांनी “जो इतरांना समजून घेतो तोच खरा देवमाणूस; आणि जो त्रास देतो तो दानवस्वरूप” असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गायत्री मंत्राचे महत्त्व समजावले आणि गुरु आज्ञेचे पालन हीच खरी तपश्चर्या असल्याचे सांगितले. जीवनात ५०% आध्यात्मिक संस्कार आणि ५०% परिश्रम यांचे संतुलन यशाच्या वाटा खुल्या करते, असे ते म्हणाले. तसेच, “दररोज माता, पिता व गुरु यांच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात केली तर जीवनात उत्तम संस्कार रुजतात,” यावर त्यांनी सखोल विवेचन केले. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘निश्चयपाठ’ घेण्यात आला.

हेही वाचा –  पंतप्रधान या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर, द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार

या यज्ञाचे नियोजन शाळेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मुख्याध्यापिका सौ. सुनिता ढवळेश्वर मॅडम आणि संचालिका पायल ढवळेश्वर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मालन लिगाडे, सौ. भारती ढवळेश्वर, सौ. आरती मुट्टगीशेत्तर, सौ. संगीता पाटील, श्री. अक्षय राणे सर आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या अध्यात्मिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवचैतन्याचे संचार झाले असून, संपूर्ण परिसर श्रद्धेने न्हाल्याचे दृश्य दिसून आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button