Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

गायत्री स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

शिक्षण विश्व; विद्यार्थ्यांनी जाणून घेतले योग अभ्यासाचे महत्व

पिंपरी चिंचवड: आजच्या स्पर्धेच्या जीवनात मुलांची मनःशांती हरवत आहे. सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मुलांची मानसिकता चांगली राहिली पाहिजे. असे शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता भोंगाळे कडू पाटील म्हणाल्या.

गायत्री इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित योग दिन कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या . यावेळी संस्था सचिव संजय भोंगाळे, विश्वस्त सरिताताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,सर्व मुख्याध्यापक-उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

कविता भोंगाळे कडू पाटील पुढे म्हणाल्या संस्था अध्यक्ष विनायकराव पंढरीनाथ भोंगाळे हे नेहमीच मुलांच्या सर्वांगिण विकासावर व आरोग्यावर लक्ष ठेवतात.हाच विचार करून योगा, सूर्यनमस्कार नेहमी घेतले जातात. मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, ते मुलांना समजावे म्हणून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून दिनांक १६ जून ते २० जून दरम्यान मुलांच्या योगा पूर्वस्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यातून निवडलेल्या मुलांच्या अंतिम स्पर्धा २१ जून रोजी घेण्यात आल्या. स्पर्धे दरम्यान क्रीडा शिक्षक रवींद्र कलवई , समाधान माने व अश्विनी कागले यांनी मुलांना विविध आसनांची माहिती दिली.

हेही वाचा –  महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीची बस पास योजना सुरू करा; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही प्राणायाम, योगासने केली.जनजागृती पर विविध आसनांची भित्तीचित्रे शालेय परिसरामध्ये लावली गेली होती, त्याद्वारे मुलांना विविध आसनांचे ज्ञान प्राप्त झाले. आमच्या शाळेतील संस्कृत शिक्षक आचार्य दीपक शिंदे हे उत्तम योगा अभ्यासक आहेत, त्यांनी मुलांना कार्यक्रमादरम्यान उपयुक्त अशी योगाची माहिती दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button