लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो..

लोणावळा : लोणावळा येथील भुशी धरण हे पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. यंदा केवळ जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात धरण भरून ओसंडून वाहू लागल्याने, पर्यटन हंगामास उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरण तब्बल १५ दिवस आधी भरलं आहे.
यंदा धरण १६ जून रोजी भरलं असून, २०२४ मध्ये ते ३० जूनला व २०२३ मध्ये १ जुलै रोजी भरलं होतं. यंदाचा पावसाळा दमदार असल्याने पर्यटनासाठी लोणावळ्याकडे मोठ्या प्रमाणावर पर्यटक वळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’, परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहिम; मंत्री प्रताप सरनाईक
पर्यटकांनी घ्यावी विशेष काळजी
तथापि, भुशी धरण परिसरात पाणी साचणे, ओल्या पायऱ्या आणि वाढलेली गर्दी यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
लोणावळा पोलीस व प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष योजना आखण्यात आली असून, पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.




