‘देवेंद्र फडणवीसांना राज-उद्धव यांना एकत्र येऊ द्यायचं नाही’; काँग्रेस नेत्याचा आरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक द्विस्ट आला. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही भावांना भाजपला एकत्र येऊ द्यायचे नसल्याचा आरोप केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, की ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे भाजपला परवाडणारे नव्हते हे मात्र नक्की. ते भाजपला होऊ द्यायचे नाही. इडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर केले जाईल ही शंकाही व्यक्त होत होती. मात्र या भेटीगाठीने राज ठाकरे यांच्यावरच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
हेही वाचा : हरित ऊर्जा विकासाचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑपरेशन सिंदूर व्हिडीओ गेम आहे काय? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. यावरून विजय वडेट्टीवार म्हणाले, ते काय बोलले हे मी ऐकले नाही. ऑपरेशन सिंदूर झाल्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हल्ला करणार आहोत, जागा रिकामी करा से पाकिस्तानला सांगितले होते. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हल्ला करण्यापूर्वी कोणी शत्रू राष्ट्राला कळवते की आम्ही ऑपरेशन करणार आहोत. हेच नाना पटोले बोलले. यात गैर काय असेही वडेट्टीवार म्हणाले.




