Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आजही ऑफर कायम’, शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वकत्व्य; राज ठाकरे – फडणवीस भेटीने चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वांद्रे येथील ‘ताज लँड्स एन्ड’ हॉटेलमध्ये झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जवळपास एक तास चाललेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी राजकारणात नवे समीकरण तयार होण्याचे संकेत यातून मिळत आहेत.

या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही भेट केवळ सौजन्यपूर्वक नव्हे, तर निश्चितच राजकीय अर्थाने झाली आहे. ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्याकडे असलेले स्पष्ट वक्तृत्व आणि जनतेमध्ये असलेले आकर्षण पाहता, त्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये आमच्या सोबत यावे, अशी आमची पुन्हा एकदा विनंती आहे.”

हेही वाचा –  Ahmedabad Plane Crash : विमान अपघातात महाराष्ट्राच्या ६ जणांचा मृत्यू

शिरसाट यांनी स्पष्ट केले की, “राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. यू-टर्न्स हे राजकीय प्रक्रियेचा भाग असतात. म्हणूनच आजच्या भेटीचा थेट संबंध कोणत्याही युतीशी जोडणे हे आत्ताच शक्य नाही. मात्र, काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.”

गेल्या काही दिवसांत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात संभाव्य जवळीक याबाबत चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, आजची फडणवीस–राज ठाकरे भेट हे नवे राजकीय संकेत देत आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे की भाजप-मनसे युती, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या भेटीनंतर राज ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकृत खुलासा अपेक्षित आहे. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय डावपेच, युतीच्या शक्यता आणि पक्षांतर्गत हालचाली यामुळे पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button