Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कराडच्या एन्काउंटरसाठी ५० कोटींची ऑफर, निलंबित पोलीस रणजित कासलेचे खळबळजनक आरोप

Share On

पुणे : वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. याबाबतची बंद दाराआड चर्चा झाली. त्याचे पुरावे तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही डायरेक्ट शूट करा असे नाही; परंतु तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कराडच्या पाठीमागे चोवीस तास राहा. चुकीचे वाटले तर कारवाई करा. तुम्हाला पन्नास करोड रुपये मिळतील, पुढे चौकशी करताना आमचे सरकार राहील, त्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त करू, असे सांगितल्याचे देखील कासले यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले. दरम्यान, कासले यांना सकाळी एका हॉटेलमधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कासले गुरुवारी (दि. १७) रात्री ९ वाजताच्या सुमारास पुणे विमानतळावर दाखल झाले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही धक्कादायक वक्तव्य केली आहेत. कासले यांच्यावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याच्यांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वी एका प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कासले पुण्यात बीड पोलिसांना शरण येणार होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ना बीड पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले ना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. कासले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुण्यात मी शरण होण्यासाठीच आलो आहे. मी अजून १५ दिवस जरी फिरलो असतो, तरी मला कोणी पकडले नसते; परंतु मी माझ्या मित्रांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बीड पोलिसांना मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे, की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. दिल्लीत असताना मी पबमध्ये, लाल किल्ल्यात सगळीकडे जाऊन आलो.

हेही वाचा –  ‘मराठीसाठी किरकोळ भांडण बाजूल ठेवतो, चला सोबत येऊ’; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देणार?

कासले म्हणाले, माझ्या खात्यात ईव्हीएम आणि धनंजय मुंडे यांच्यापासून दूर राहण्यासाठी १० लाख रुपये पाठविण्यात आले होते. कराड आणि मुंडे यांच्या संत बाळुमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून हे पैसे आपल्या बँक खात्यात आल्याचा दावा कासले यांनी केला आहे. आपण पुण्यात येणार असल्याचे कासले यांनी व्हिडिओ शेअर करत सांगितले होते, तसेच पुणे पोलिसांनी संरक्षण देऊन बीड पोलिसांकडे आपल्याला सोपवावे, अशी मागणी देखील कासले यांनी केली होती.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले कासले?

मी दिल्ली एयरपोर्टला आहे आणि माझी फ्लाइट लेट झाली होती. सव्वातीन वाजताची होती; पण ती आता पावणेसातची आहे. ९ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो. मी एवढा वेळ खरे सांगत नव्हतो; परंतु आता आतमध्ये एंट्री झालेली आहे, चेकिंग झालेली आहे. बोर्डिंग पास घेतलेला आहे, तर येतोय मित्रांनो पुण्यात. जेव्हा येईल मी पुण्यात, तेव्हा अटक करा मला गुन्ह्यात. माझी एक विनंती प्रशासनाला व पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावे आणि बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावे मला, ही माझी पुणे पोलिसांना विनंती आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button