Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आई नव्हे तू वैरीण!

पोटच्‍या मुलाचा क्रूर छळ; आईवर गुन्हा दाखल

शिक्षिकेच्या सतर्कतमुळे प्रकार उघड

पिंपरी :  पोटच्‍या लहान मुलाला चटके देऊन, वरच्यावर उपाशी ठेवून, काठीने मारहाण करणाऱ्या आईच्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी परिसरात घडली.

याबाबत पोलिसांच्‍या दामिनी पथकातील महिला पोलिसाने बुधवारी (९) याबाबत सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्‍या आईच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फेब्रुवारी 2025 ते 9 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये सांगवी परिसरात घडली.

वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने तिच्‍या अन्वय नावाच्या मुलाला मानसिक त्रास दिला. त्याच्या शरीराला चटके दिले. त्याला उपाशी ठेवून झाडूने व काठीने मारहाण यारत होती.

हेही वाचा –  अभियांत्रिकीची पाठ्यपुस्‍तके मराठी भाषेत उपलब्ध

असा झाला उलगडा

लहान मुलाच्‍या शरीरावरील चटके पाहून त्‍याच्‍या वर्ग शिक्षिकेने याबाबत त्‍याला विचारले. त्‍यानंतर आई करीत असलेल्‍या छळाची कहाणी त्‍याने सांगितली. त्‍यानुसार शाळेत गस्‍तीसाठी येत असलेल्‍या दामिनी पथकातील महिला पोलिसांना शाळेने ही बाब कानावर घातली. त्‍यानंतर माहितीची सत्‍यता पडताळून महिला पोलिसाने त्‍या मुलाच्‍या आईच्‍या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

अनेकदा शाळकरी मुलांच्या बाबतीत अशा घटना घडताना दिसून येतात. मुले त्यांच्याबाबत झालेल्या प्रकाराबाबत वाच्यता करत नाही. अनेक क्रूर प्रसंगांना या मुलांना सामोरे जावे लागते. अशा वेळेस सतर्क राहून प्रत्येकाने या मुलांना अशा प्रकारांपासून वाचवणे गरजेचे ठरते. या प्रकारातही शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे संबंधित मुलाच्या बाबतची घटना समोर आली आहे.

– महेश बनसोडे, वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button