‘मविआच्या सरपंचांना निधी मिळणार नाही’; मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान
![Nitesh Rane said that Mahavikas Aghadi sarpanchs will not get funds](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Nitesh-Rane-said-that-Mahavikas-Aghadi-sarpanchs-will-not-get-funds-780x470.jpg)
Nitesh Rane | महाविकास आघाडीमधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. जे उरले सुरले आहेत त्यांनीही प्रवेश करावा. प्रवेश केला तरच विकास होईल. महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला जाईल, अशी भूमिका भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांनी बुधवारी ओरोस येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना स्पष्ट केली.
मंत्री नितेश राणे म्हणाले, आपणास सर्व भाजप कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करावयाची आहे. यासाठी जास्तीतजास्त इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतो आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1 कोटी पेक्षा अधिक सभासद नोंदणी झाली आहे. येणार्या निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरच असला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी गावात संघटन मजबूत करा, पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. निधी फक्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच दिला जाणार आहे. महाविकास आघाडीमधील पक्षाचा सरपंच असेल तर त्याला एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही.
हेही वाचा : ‘लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भाजपमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल. उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे आवाहन करतानाच येणार्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट कायम असायला हवे, त्यासाठी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, कारण निवडून येणारे महायुतीचेच असणार आहेत. चुकून विरोधी पक्षाचे कुणी आलेच तर त्यांनाही आतमध्ये घेऊ. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना मदत करू नये, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.