Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

आता रुग्णांना मिळणार ‘विशेष’ ओळख, रुग्णालयांना ‘युनिक आयडी’द्वारे मिळवता येणार माहिती

Patient will get Unique ID | राज्यातील प्रत्येक रुग्णाची सर्व माहिती, त्यांच्या आजारांचा पूर्वेतिहास आदी तपशील रुग्णालयांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आरोग्यसेवेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून सर्व रुग्णांना एक युनिक आयडी देण्यात येणार आहे.

या आयडीच्या माध्यमातून रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाईल तिथे रुग्णाचे नाव, पत्ता सर्व महत्त्वाची माहिती, त्याच्या आजारांचा पूर्वेतिहास रुग्णालयांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एखाद्या रुग्णालयात रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता आहे की त्याला केंद्र अथवा राज्याच्या कुठल्या योजनेचे लाभ मिळू शकतात, याचाही निर्णय सरकारकडूनच घेण्यात येणार असून रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी पायपीटही त्यामुळे थांबेल.

हेही वाचा   :  विद्यार्थ्यांनी कला सादरीकरणातून जिंकली उपस्थितांची मने!

रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक युनिक आयडी मिळणार असून, त्या माध्यमातून रुग्णाची माहिती त्यावर संग्रहित केली जाणार आहे. रुग्णाला दाखल करून घेतल्यानंतर त्याच्या ओळखपत्राच्या प्रती घेऊन त्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी रुग्णालयावरच टाकण्यात येणार असून, त्या माध्यमातून अचूक माहिती जमा करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button