ताज्या घडामोडीमनोरंजन

बांगलादेशी अभिनेत्री मेहेर अफरोज शाओन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या ताब्यात

देशद्रोहाचा गंभीर आरोप सरकारविरोधात पोस्ट करणं भोवलं?

बांगलादेश : बांगलादेशातील मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकप्रिय बांगलादेशी अभिनेत्री तसंच राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका असणाऱ्या मेहेर अफरोज शाओनला बांगलादेश पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने ताब्यात घेतले आहे. अभिनेत्रीवर देशाविरोधात कट रचल्याच्या आणि देशद्रोहाचा धक्कादायक आरोप आहे. ढाका येथील धनमंडी परिसरातून तिला ताब्यात घेतले गेले. अतिरिक्त आयुक्त रेझाउल करीम मोलिक यांनी अभिनेत्रीला ताब्यात घेतल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तिला कोणत्या माहितीच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांनी ANI शी बोलताना असे म्हटले की, अद्याप तिला अटक करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

‘कृष्णपोखो’ या चित्रपटातील परफॉर्मन्ससाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा बांगलादेश राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही तिला मिळाला आहे. शाओन एक दिग्दर्शिका, गायिका आणि नृत्यांगनादेखील आहे. ANI च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर तिने बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर टीका करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या, या कारणामुळेच तिला अटक करण्यात आली असावी असे मत व्यक्त केले जाते आहे.

हेही वाचा   : महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? राहुल गांधी 

राजकीय संबंधांमुळे अभिनेत्रीला ताब्यात घेतले?

याशिवाय शाओनच्या राजकीय संबंधांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. शाओनचे वडील, इंजिनियर मोहम्मद अली, अवामी लीगचे एक वरिष्ठ नेते आहेत आणि तिची आई त्याच पक्षाची संसद सदस्य होती. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी असलेले तिचे संबंध आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या प्रशासनाविरुद्ध स्पष्टपणे बोलणे यामुळे तिला राजकीय लक्ष्य बनवले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

दरम्यान, ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी एका जमावाने ढाका येथील शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. घराच्या एका मजल्यावर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. अवामी लीगवर बंदी घालण्याची त्यांची मागणी होती, हे आंदोलक गेट तोडून परिसरात घुसले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

याशिवाय आणखी एका घटनेमध्ये अभिनेत्री शाओनचे जमालपूर येथील शाओन वडिलोपार्जित घर गुरुवारी संध्याकाळी ६: वाजण्याच्या सुमारास जाळण्यात आले. डेली स्टारने याविषयी वृत्त दिले आहे. हे घर अभिनेत्रीच्या वडिलांचे होते. बांगलादेशमध्ये वाढती अशांतता, निदर्शने आणि अवामी लीग नेत्यांच्या संपत्तीवर होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान अभिनेत्रीला ताब्यात घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बांगलादेशातील आधीच अस्थिर राजकीय वातावरणात शाओनला ताब्यात घेतल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button