Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

MAI : मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस

उपाध्यक्षपदी डॉ. अब्दूल कादीर, सरचिटणीसपदी लक्ष्मीकात घोणसे-पाटील

पुणे : मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया ( माई ) संघटनेच्या संस्थापकांची पुणे येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्य कार्यकारणी सर्वानुमते निवडी केली आहे.

यावेळी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस व उपाध्यक्षपदी डॉ.अब्दुल कदीर आणि सरचिटणीसपदी लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

‘पत्रकार महामंडळ’ हे आमच्या संघटनेच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या संकल्पनेतून आले आहे. त्यासाठी त्यांनी २ दिवस आमरण उपोषण केले आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ घोषित केले; हे महामंडळ गठित होणे, बजेट अधिवेशनात यासाठी तरतूद होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी त्या आग्रही आहेत, असे संस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा –  PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका महिला बचत गटांना ३७ गाळे मोफत देणार!

आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम करण्यात येणार असून पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपली संघटना अग्रेसर कशी राहिल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले.यावेळी सर्व संस्थापक सदस्य उपस्थित होते.

अन्य पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे…

यावेळी महाराष्ट्रातील विभागीय अध्यक्षांची व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. चेतन काशीकर – खजिनदार , शेखर धोंगडे – सहसचिव पदी निवड करण्यात आली तर मुंबई विभागीय अध्यक्ष – गणेश तळेकर ( मुंबई शहर ) व अनिल चासकर ( मुंबई उपनगर), कोकण विभागीय अध्यक्ष सुनिल कटेकर – (रायगड) व प्रवीण वाघमारे (ठाणे) मराठवाडा विभागीय अध्यक्ष – शेख मजहर (संभाजीनगर) व पुनम मिश्रा , नाशिक विभागीय अध्यक्ष – चंद्रशेखर पाटील (धुळे), अमरावती विभागीय अध्यक्ष’ सुरेंद्र आकोडे (अमरावती ), यांची नियुक्ती करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button