क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टीम इंडिया पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज

मॅचच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात?

पुणे : टीम इंडिया सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. टीम इंडियाने 31 जानेवारीला पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये रंगतदार सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी मात करत मालिका जिंकली. टीम इंडियाने पुण्यातील विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी निर्विवाद आघाडी घेतली. टीम इंडियाचा हा पुण्यातील तिसरा टी 20 विजय ठरला. त्यानंतर आता दोन्ही संघ या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. या पाचव्या सामन्याबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना रविवारी 2 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवरुन पाहायला मिळेल.

हेही वाचा –  १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणारबजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत

इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button