‘विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला’; राज ठाकरेंकडून शंका उपस्थित
![Raj Thackeray says silence prevails in Maharashtra after assembly results](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Raj-Thackeray-says-silence-prevails-in-Maharashtra-after-assembly-results-780x470.jpg)
Raj Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अखेर दोन महिन्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शंका उपस्थित केली.
राज ठाकरे म्हणाले, की बऱ्याच दिवसांनी मी तुमच्याशी बोलतोय. निकालावरती प्रतिक्रिया मी दिली होती, त्यानंतर मी बोललो नव्हतो. शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही. सगळ्या गोष्टींचे विवेचन, आकलन चालू होते. महाराष्ट्रात निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा असं बघितलं की सन्नाटा आला. असा कसा निर्णय आला. लोकांमध्ये संभ्रम होता. माझ्याकडे संघाशी संबंधित व्यक्ती होती, त्यांच्याही मनामध्ये दिसलं की, काही गोष्टींवर विश्वासच बसत नाही. मी त्यांना म्हटलं इतना सन्नाटा क्यो है भाई? कोणीतरी जिंकलं असेल ना?
हेही वाचा : PCMC | अतिक्रमण कारवाईला विरोध; चिखली-कुदळवाडीतील व्यापारी रस्त्यावर!
हे राजू पाटील माजी आमदार. त्यांच एक गाव आहे, पाटलांचेच गाव त्यांनाच मतदान होतं. १४०० लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना एकही मतदान झालं नाही. अख्ख्या गावात एक मतदान नाही पडतं. १४०० च्या १४०० मत पडायची. त्यापैकी एकही मत पडत नाही. आपला मराठवाड्यातला एक पदाधिकारी आहे. त्याला नगरसेवक असताना साडेपाच हजार मतदान आहे, त्याला आत्ता विधानसभेला त्याच्या वार्डामध्ये अडीच हजार मतदान झाले. अनेक असे निर्णय आहेत, ज्यावर विश्वास बसत नाही. निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
अजित पवारांचे ४२ आमदार आले कसे? राज ठाकरे
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते, सात वेळा आमदार झाले.. सात वेळा जो आमदार ७० हजार मतांनी निवडून यायचे त्यांचा १० हजार मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणू बोलतातेय. मी काय आख्खा महाराष्ट्र बोलतोय.. निवडून आलेल्यांचे, सत्तेत असलेल्यांचे सुद्धा मला बोलतील. २०१४ ला १२२ जागा होत्या, अजित पवारांना ४२… चार पाच जागा येतील असं वाटत असताना इतक्या जागा.. आणि ज्यांच्या नावावर हे आले त्या शरद पवारांना १० जागा मिळतात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.