स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.
२२ जानेवारीला ही सुनावणी होणार होती मात्र ती होऊ शकली नाही. आज ही सुनावणी पार पडणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : PCMC | रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन
एप्रिल-मे महिना किंवा ऑक्टोबर महीन्यात निवडणुका हाेण्याची शक्यता राजकिय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीनसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा चारसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
राज्यात ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित
२९ महापालिका
३२ जिल्हा परिषदा
२४४ नगरपालिका
२८९ पंचायत समिती
४१ नगर पंचायत




