बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाला दुखापत
तीन हाडे तुटली, चालताही येत नाही
![Bollywood, actress, Rashmika, Mandana, injury, three, bones, broken,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/rasmika-780x470.jpg)
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल, त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल सर्वच चाहत्यांना नेहमीच आकर्षण असतं. पण फक्त आकर्षणच असतं असं नाही तर काळजीही असते. आपल्या आवडत्या, लाडक्या कलाकारांबद्दल काही चुकीचे घडत असेल तर चाहते नक्कीच हे सहन करू शकत नाही. अशीच एक घटना घडली आहे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोबत.
रश्मिका मंदानाला दुखापत
ही अभिनेत्री म्हणजे लाखो दिलों की धडकन आहे. जिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पडते. अशी अभिनेत्री जेव्हा अचानक व्हील चेअरवरून येताना दिसते तेव्हा मात्र चाहत्यांना धक्का बसणं सहाजिकच आहे. ही अभिनेत्री म्हणजे दक्षिणात्य चित्रपट आणि आता बॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना.
होय, नुकतीच, सोशल मीडियावर रश्मिकाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रश्मिकाने सोशल मिडीयावर आपल्या एक्स-रे रिपोर्टचा फोटो शेअर केला. तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे चाहते थक्क झाले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमधील रिपोर्ट्सवरुन तिला आता चालता सुद्धा येत नसल्याचं स्पष्ट होत आहे. तिच्या शरीराची तीन हाडे तुटल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं.
व्हील चेअरवर बसूनच एअरपोर्ट बाहेर आली
रश्मिकाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओ मध्ये ती ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमासाठी तयार होताना दिसली. या व्हिडीओ मध्ये रश्मिका ही लाल रंगाच्या ड्रेस मध्ये तसेच व्हील चेअरवर दिसली. एवढच नाही तर तिचा एअरपोर्टवरीलही व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तिला व्हील चेअरवर बसून एअरपोर्ट बाहेर आणल्याचं दिसत आहे. दरम्यान कोणाला तिची ओळख पटू नये म्हणून तिने तोंडाला मास्क लावला होता, डोक्यावर मोठ्या आकाराची तिचा चेहरा झाकला जाईल अशी एक टोपीही घातली होती. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.
हेही वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लष्कराचे संचलन
फ्रॅक्चर
रश्मिकाच्या पायाचे हाड हे तीन जागी तुटलं आहे. एक्स-रे रिपोर्टसोबतच एक व्हिडीओही रश्मिकाने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिकाची मैत्रिण तिच्या प्लास्टरवर डिझाईन बनवत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रश्मिकाने लिहिले, “माझ्या मैत्रिणीने बाहेरुन खूप सुंदर डिझाइन काढले आहे, मात्र त्याच्या आतील तीन हाडे तुटलेली आहेत.”
चाहत्यांना दिली फ्लाइंग किस
या पोस्टमध्ये रश्मिकाने शेवटी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये रश्मिका ही चाहत्यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहे. या सोबतच गेले दोन दिवस तिने जमिनीवर पाय ठेवला नसल्याचं सुद्धा सांगितलं. “तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. लहान गोष्ट सुद्धा अजिबात हलक्यात घेऊ नका. माझं खूप सारं प्रेम तुमच्यासोबत आहे.” असं देखील ती व्हिडीओ पोस्ट करताना म्हणाली.
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. तसेच ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थनाही केल्या आहेत. पण रश्मिकाला अशा अवस्थेत पाहून तिच्या चाहत्यांना खूपच वाईट वाटलं आहे.