अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला येणार PM Kisan योजनेचा १९ वा हप्ता
![19th installment of PM Kisan Yojana to come on February 24](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/19th-installment-of-PM-Kisan-Yojana-to-come-on-February-24-780x470.jpg)
PM Kisan 19th Installment Date | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. शेतकरी कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात २४ तारखेला हप्ता वितरीत केला जाणार आहे.
हेही वाचा : ‘देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम’; प्रणिती शिंदे यांची टीका
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना ही भारत सरकारची एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २००० रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचे २००० हप्ते देण्यात आले आहेत.