सुजाण नागरिक होण्याकरता भूगोलाची जाण आवश्यक; डॉ. विजय खरे
प्रा. रामकृष्ण मोरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी येथे भूगोल सप्ताह

पुणे | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी येथे भूगोल सप्ताहानिमित्त डॉ विजय खरे अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व प्रा डॉ सुधाकर परदेशी भूगोल विभाग, सा. फु. पुणे विद्यापीठ पुणे यांचे विशेष व्याख्यान व पावर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली अशी माहिती भूगोल विभाग प्रमुख डॉ सुचित्रा परदेशी व महाविद्यालयाचे प्राचार्य अभय खंडागळे यांनी दिली.
सदर स्पर्धेमध्ये २० विद्यार्थ्यांनी भूगोल विषयाशी संबंधित पी.पी.टी चे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमासाठी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर चे प्राचार्य डॉ रवींद्र चौधरी, तसेच उपप्राचार्य डॉ एच. बी. सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. विजय खरे यांनी ज्या विद्यार्थ्यांना भूगोल व इतिहास या दोन्हीही विषयाची जाण आहे, असे विद्यार्थी समाजात वेगाने प्रगती करतात. भूगोल विषयाचे वैश्विक पातळीवरील महत्त्व व्यक्त करत असताना सरांनी राजकीय भूगोलामधील विख्यात अशा हर्डलॅंड सिद्धांत व रीमलँड सिद्धांतानुसार भौगोलिक पार्श्वभूमीचा फायदा घेऊन जगावरती कशाप्रकारे प्रभुत्व मिळवले जाऊ शकते याविषयीचे मार्गदर्शन केले.
हेही वाचा : भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ
आपल्या मनोगताममध्ये डॉ. सुधाकर परदेशी यांनी भूगोल हा विषय चार भिंतींच्या बाहेर कशा पद्धतीने निरीक्षण आणि अनुभवातून शिकला जाऊ शकतो हे विद्यार्थ्यांना सांगितले. याचबरोबर करिअरच्या दृष्टीने भूगोल विषयांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी आहेत व त्याची पूर्वतयारी कशा पद्धतीने करावी याबाबत ही मार्गदर्शन केले.
करिअरसोबत समाजाच्या उन्नतीसाइी प्रयत्न करा : प्रा. अभय खंडागळे
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य अभय खंडागळे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर घडवत असतानाच पर्यावरण व समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा डॉ सुचित्रा परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ अमोल बिबे यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ रमेश गोपाळे, प्रा भगवंता स्वामी, प्रा कल्याणी खेतमाळीस, प्रा प्रसाद झिंगरे, प्रा समीक्षा अंभोरे व प्रा वैष्णवी आचार्य यांनी विशेष परिश्रम घेतले.





