बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची तब्येत बिघडली
उपचारासाठी रुग्णालयात दाखल ,आज त्यांच्या जामीन अर्जाची केज जिल्हा न्यायालयात सुनावणी
![seed, extortion, treatment, hospital, admission, bail, application, court,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/karad-1-780x470.jpg)
बीड : बीडच्या मस्साजोग येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्याला काल रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रात्री एक वाजता आणण्यात आले . तेथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान याच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
वाल्मिक कराड याची सोनोग्राफी करण्यात आली तसेच त्याची मधुमेहाची तपासणी झाली. त्याचं ब्लड प्रेशरही चेक करण्यात आलं. काल रात्री 11.45 च्या सुमारास त्याला बीड कारागृहातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडच्या मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याला 14 तारखेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याचे वकील अशोक कवडे यांनी त्याच दिवशी कराडच्या जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सरकारी पक्ष आणि तपास अधिकाराचे उत्तर मागवले होते. आता याच प्रकरणी आज केज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराड याला न्यायालयाकडून जामीन मिळतो काय कडे संपू्र्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा
कृष्णा आंधळे फरार घोषित
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा मागच्या महिनाभरापासून सापडत नाहीय. त्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे.
सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड पुण्याला गेला ?
दरम्यान खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व ईतर आरोपी सीआयडीला शरण येण्या पूर्वी बीड वरून पुण्याला गेले होता का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेची पुष्टी देणारे तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. त्यांनी बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे. तसेच याच आलेशन गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. पाषाण येथे सीआयडी च्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ mh23 bg 2231 जी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे, अशीही माहिती समोर आली आहे.