कमी वयामध्ये लठ्ठपणाच्या समस्या मुलांमध्ये पाहायला मिळतात
ऐन तारुण्यात हृदयविकाराचा धोका का वाढतोय?
![Underage, age, obesity, problems, child, seeing, aging, youth, heart disease, risk, increased,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/hsrts-780x470.jpg)
महाराष्ट्र : आजकाल अगदी कमी वयामध्ये लठ्ठपणाच्या समस्या मुलांमध्ये पाहायला मिळतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा सवयींमुळे तुमच्या मुलांच्या शरीरामध्ये भरपूर हार्मोनल बदल दिसून येतात. वाढलेल्या वजनामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे तुमची मुलं आळीशी होऊ लागतात. लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. वाढलेल्या चरबीमुळे तुम्हाला तुमचं अंग जड जड वाटू लागतं.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट्सचा नियमित सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी आहारासोबत नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. अनेक पालकांना प्रश्न पडतो की मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आणि तो कसा नियंत्रित करता येईल? चला जाणून घेऊया.
आजकालची मुलं घरात बनलेलं अन्न सोडून जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करतात. मार्केटमधील प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. लठ्ठपणामुळे मुलांच्या शरीरात आजकाल अनेक प्रकारचे आजार पाहायला मिळतात. लठ्ठ मुलांमध्ये टाइप-2 मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढते. शरीरातील लठ्ठपणा वाढल्यामुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. असंतुलित आहार आणि खराब जीवनशैलीमुळे मुलांमध्ये हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. खराब आहाराचे सेवन केल्यामुळे लहान वयातच मुले कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाचे शिकार होतात. अनियमित आहारामुळे मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढताना दिसतोय. मुलांमध्ये लठ्ठपणामुळे दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्या वाढतात.
वाढत्या वजनामुळे फुफ्फुसांवर दबाव वाढतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये मानसिक ताण वाढतो. लठ्ठ झालेली मुलं स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजतात ज्यामुळे अनेकदा त्यांना एकटं वाटते. लठ्ठ मुलांमधील आत्मविश्वास कमी होऊ लागतो ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते. लठ्ठपणामुळे हाडे आणि सांध्यांवर जास्त दबाव येतो ज्यामुळे मनगट, कोपर, गुडघा यासह सांधे दुखू लागतात. या कारणामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक आजार वाढतात आणि त्यामुळे मुलांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा :
मुलांनी जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि अति गोड पदार्थ खाणे टाळावे.
मुलांनी हिरव्या भाज्या, फळे, कडधान्यांचा आहारात समावेश करावा.
मुलांनी त्यांच्या आहारामध्ये हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजेल
मुलांनी दररोज 1 तास खेळावे किंवा शारीरिक हालचाल आणि व्यायाम करावा.
मुलांनी दररोज 8-10 तासांची झोप घेतली पाहिजे. पुरेशा झोपेने शरीराचे वजन संतुलित राहते.