इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये स्वरांजली पाटील हिला सुवर्णपदक !
वाकडमधील इंदिरा नॅशनल स्कूल विद्यार्थीनीचे उल्लेखनीय यश
पिंपरी-चिंचवड : शालेय शिक्षण जीवनातील स्पर्धा परीक्षा अर्थात इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ इंग्लिश लीग-2025 मध्ये कु. स्वरांजली संजय पाटील हिने सुवर्णपदक पटकावले.
वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 3 रीमध्ये स्वरांजली शिक्षण घेत आहे. तीला एकूण 84 गुण मिळाले असून, क्लासमध्ये ती अव्वल ठरली आहे. तसेच, परीक्षेच्या दुसऱ्या फेरीमध्ये तिचा समावेश झाला आहे. राज्यातील क्रमवारीमध्ये तिचा 209 वा आणि झोनच्या क्रमवारीमध्ये स्वरांजलीने 263 वा क्रमांक पटकावला आहे.
इंग्लिश इंटरनॅशनल ऑलिम्पियाड (EIO) भाषा कौशल्य विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण परीक्षापैकी एक आहे. ही एक इंग्रजी व्याकरण आणि भाषा स्पर्धा आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयावर असलेल्या ज्ञानावर आधारित मोजते. या परीक्षेत भाग घेण्यासाठी इयत्ता १ ते इयत्ता १० पर्यंतचे विद्यार्थी आमंत्रित केले जातात. ते विविध शाळांमधून आणि विविध बोर्डांमधून असू शकतात. कु. स्वरांजली पाटील हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल तीचे कौतूक करण्यात येत आहे.
भाषा कौशल्य सुधारण्यासाठी इंटरनॅशलन ऑलिम्पियाड …
इंग्लिश इंटरनॅशनल ऑलिम्पियाड (EIO) परीक्षेचा अभ्यासक्रम CBSE, ICSE आणि राज्य बोर्डांद्वारे निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमासारखा आहे. या परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या इंग्रजी ज्ञानाची इतरांच्या तुलनेत चाचणी करणे आहे. याशिवाय, हे विद्यार्थ्यांना वाक्य रचना, भाषेचे घटक, समज यामध्ये प्रावीण बनवते आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या लेखन कौशल्यामध्ये सुधारणा करते. तसेच, विद्यार्थ्यांना आत्मविश्वासी बनवते आणि त्यांच्या संवाद कौशल्याचा विकास करते. भाषा कौशल्य सुधारण्यासाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण ठरत आहे.





