Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जप्त केलेल्या वाहनांचा होणार लिलाव

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ६३ वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनमालक, चालक व वित्तदात्यांनी ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहनांचा कर व दंड त्वरित भरून वाहने सोडवून घेऊन जावे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत वाहने जप्त केली आहेत. यातील काही वाहनांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, तर काही वाहनमालकांनी कर व दंड न भरल्यामुळे अनेक वर्षापासून ही वाहने आरटीओ कार्यालयात पडून आहेत.

हेही वाचा –  स्वामित्व योजनेमुळे जनतेच्या उत्पन्नात वाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

यातील ६३ वाहनमालकांनी वाहने सोडवून नेण्यासाठी आरटीओशी संपर्क केला नाही. गुरुवारपासून (दि. १६) पुढील ३० दिवसांत वाहनांचा कर व दंड भरून वाहने सोडवून घेऊन जावीत. अन्यथा त्या वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय आरटीओ प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा – वाकड-हिंजवडी भागातील वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून पीएमआरडीए करणार नवीन रस्ते व वाहतुकीचे नियोजन

ई- लिलावाची तारीख, वाहनांचा यादी, वेळ व ठिकाणी www.eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button