ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स

‘आयसीएआयसीईटी २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० हून अधिक संशोधन निबंध प्राप्त

तळेगाव दाभाडे : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालय, वऱ्हाळे, तळेगाव येथे एमसीए विभागाच्या वतीने ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग अँड इमर्जिंग ट्रेंड्स इन रिसर्च, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीज (आयसीएआयसीईटी २०२६)’ या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचे २३ व २४ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिल्या या कॉन्फरन्सला संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. सुशांत पाटील आणि सीईओ ॲड. अनुजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य तथा परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. डी. शिरबहादुरकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली. शैक्षणिक अधिष्ठाता तथा कार्यक्रमाचे सेक्रेटरी डॉ. योगेश गुरव यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली कार्यक्रमाला दिशा मिळाली. कीनोट स्पीकर डॉ. संदीप पांडे, परिषदेचे संयोजक तथा एमसीए विभागप्रमुख प्रा. मनीष राऊत, रजिस्ट्रार श्री. नामदेव वेताळे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्यामसुंदर कोसबटवार आणि सेशन चेअर डॉ. नवनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. मनीष राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कॉन्फरन्सच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. संशोधकांशी समन्वय, संशोधन निबंधांचे संकलन, विविध सत्रांचे नियोजन आणि आयोजनाच्या विविध बाबींचे व्यवस्थापन करत त्यांनी कॉन्फरन्सला आकार दिला.

हेही वाचा –  खरगेंच्या ‘मोदी का बाप भी जाएगा’ विधानावरून राजकीय वाद; अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

परिषदेसाठी १५० हून अधिक संशोधन निबंध प्राप्त झाले. त्यापैकी १०० हून अधिक निबंध स्वीकारण्यात आले, तर ६० हून अधिक निबंधांची नोंदणी झाली. २३ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष, तर २४ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन सत्रे पार पडली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग, रिसर्च, इनोव्हेशन आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज यातील बदलत्या प्रवाहांवर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.

कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन प्राध्यापक सृष्टी हिंगे आणि अनुराधा बोबडे यांनी केले. कॉन्फरन्सच्या आयोजनासाठी प्राध्यापक गोपाल टोंचर, डॉ. व्यंकट माने, प्रशांत राऊत, सुयश काकडे, आकाश गायकवाड, मुस्कान नायकवाडी, मोहन शिंगाडे, निखिल लाडे, अमोल नरवाडे तसेच सर्व विभागप्रमुखांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध सहभाग आणि प्रभावी समन्वयामुळे कॉन्फरन्स यशस्वीपणे पार पडली.

आयसीएआयसीईटी २०२६च्या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळाली असून, संस्थेच्या इतिहासातील ही पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button