पुणे पोलीस आयुक्तांनी दिली कोरेगाव पार्क परिसराला भेट; पायी रस्त्यावरुन चालत नागरिकांशी साधला संवाद

पुणेः नुकतेच एका संस्थेने पुणे शहराचा वाहतूक कोंडी बाबत जगात चौथा क्रमांक लागत असल्याचे सांगितले होते. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्येच्या अनुषंगाने कोरेगाव पार्क परिसराला भेट दिली. तसेच पायी पेट्रोलिंग करीत नागरिकांशी संवाद साधत साधला. यावेळी नागरिकांनी त्यांच्या अडचणी अमितेशकुमार यांच्यासमोर मांडल्या. त्या अडचणी समजून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करत अडचणी सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
हेही वाचा –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर जाणार
अमितेश कुमार यांची ओळख कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त म्हणून केली जाते. त्यांनी कोरेगाव पार्क परिसरात पायी पेट्रोलिंग करत गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातसह नॉर्थ मेन रस्ता येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. येथील स्थानिक प्रश्न अडचणी नागरिकांकडून जाणून घेतल्या. नागरिकांनी वाहतूक प्रश्न तसेच अवैध स्टॉलबाबत त्यांच्यासमोर अडचणी मांडल्या. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
हेही वाचा – पुणे ग्रामीणची ठाणी आयुक्तालयाला जोडण्यास विरोध
कोरेगाव पार्क परिसरात वाहतूक कोंडीच समस्या गंभीर बनली आहे. दररोज सायंकाळनंतर नॅार्थ मेन रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना होतो. तसेच येथील उर्वरित रस्त्यावर अतिक्रमणे, बेकायदा पार्किंग अशा देखील समस्या भेडसावित असल्याचे नागरिकांनी पोलीस आयुक्तांना सांगितले.





