आजचे राशिभविष्य : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल
मेष : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तूळ : गुरुकृपा लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.





