Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापलिकेच्या ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ

पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग “स्वच्छतेविषयी कायम जागरूक असतो. नदी हा आपला सांस्कृतिक वारसा. याच नद्याच्या आसपास असणाऱ्या घाट परिसर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला नदीच्या पावित्र्या बरोबरचं तिथला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आपण जपणे आवश्यक असते. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून रविवार, ५ जानेवारी २०२५ रोजी, म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण घाट येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संकलित कचऱ्याचे सेग्रीगेशन करून त्याचे वजन अंदाजे ३ ते ४ टन कचरा गोळा करण्यात आला. या दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली. “कचरा मुक्त पिंपरी-चिंचवड” करण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, असे संदेश दिले गेले. “स्वच्छतेतूनच प्रगती साध्य होईल, चला आपण सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प करून आपल्या शहराला कचरा मुक्त बनवूया,” असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग तातडीने हटवा’; आयुक्त शेखर सिंह यांचे आदेश

नदी हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याच्या आसपासचा घाट परिसर असेल अथवा नदीच्या आसपासचा परिसर तो स्वच्छ रहावा म्हणून रिव्हर प्लॉगेथॉन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.त्याचप्रमाणे आपण शहरातील सर्व नदी घाट स्वच्छतेचे नियोजन केले आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून कचरा मुक्त पिंपरी-चिंचवड करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे.

अजिंक्य येळे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button