वही हरवली म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारले
विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ,मुलाच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार
![notebook, teacher, bedam, beat, back, turn, child, parent, education, department, complaint,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/nashik-780x470.jpg)
नाशिक : शाळेतील शिक्षकांवर पालकांचा खूप विश्वास असतो, त्यामुळेच ते निर्धास्तपणे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत असतात. आपली मुलं सुरक्षित राहतील, शिक्षकांकडून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायाल मिळतील असा विश्वासही पालकांना असतो. पण नाशिकमधअये एका शिक्षकाने जे केलं ते पाहून कोणाचाही शिक्षक या व्यक्तीवरूनच विश्वास उडेल, त्या विश्वासाला तडा जाईल. नाशिकमध्ये एका शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अनानुष मारहाण केली आहे. आणि त्यातचं कारण तर अतिशय शुल्लक आहे. वही हरवली म्हणून त्या विद्यार्थ्याला बेदम चोप देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत हा भयानक प्रकार घडला आहे. केवळ वही हरवली म्हणून तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत आयुष सदगीर हा मुलगा तिसरीत शिकतो. मात्र त्याची वही हरवली म्हणून शिक्षकाने त्याला अमानुषपण चोप देण्यात आला. त्याच्या पाठीवर वळही उठले आहेत.
यामुळे संतापाचे वातवरण असून त्या मुलाच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. शुल्लक कारणांवरन विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.