पोटदुखी हे हिपॅटायटीस विषाणूजन्य आजाराचे लक्षण
पोटदुखीचा वारंवार त्रास होत असेल तर वेळीच उपचार करा
![Stomach pain, hepatitis, viral, illness, symptoms,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pota-dukhi-780x470.jpg)
महाराष्ट्र : पोट दुखणे जरी एक सामान्य समस्या आहे. हवामानातील बदलांमुळे पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पोटात जळजळ होते तर हिवाळ्यात मंद पचन संस्थेमुळे पोटदुखी होऊ शकते. पण वारंवार पोटदुखी होत असेल तर यकृतासंबंधित गंभीर आजार असू शकतो.
आजकालच्या जीवनशैलीमुळे यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत. यात प्रक्रिया केले पदार्थ, जंक फूड आणि चहा, कॉफी यांचे सेवन अतिप्रमाणात केल्याने यकृताचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. फॅटी लिव्हर डिसीज आणि लिव्हर सिरोसिस असलेल्या रुग्णांच्या संख्येत गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशावेळी यकृताच्या आरोग्यामध्ये होणारे बदल आणि त्यांच्याशी संबंधित संकेताकडे लक्ष दिले पाहिजे.
यकृताच्या आजारांची सर्वात मोठी समस्या म्हणजे यकृताच्या आजारांची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. यामुळे यासंबंधित आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतात. अशावेळी पोटदुखी, किडनी दुखणे किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
यकृत खराब
जेव्हा यकृतामध्ये चरबीचे प्रमाण वाढू लागते तेव्हा यकृतामध्ये सूज येते आणि त्यामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. पोटात वारंवार दुखणे हे यकृत खराब होण्याचे प्रमुख लक्षण असू शकते. जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका .
हिपॅटायटीस
पोटदुखी हे हिपॅटायटीस या विषाणूजन्य आजाराचे लक्षण असू शकते. हा आजार पावसाळ्यात होण्याची शक्यता असते. हिपॅटायटीसमुळे रुग्णांना ताप, उलट्या, थकवा यासोबत पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे फॅटी लिव्हर किंवा लिव्हरमध्ये वाढलेली सूज यामुळेही पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे, जर तुम्हाला वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळीच उपचार सुरू करा.