मी स्वतः ईव्हीएम वर चारवेळा निवडून आले, मी कसं म्हणू घोटाळा आहे? सुप्रिया सुळेंचं विधान

Supriya Sule | बारामती विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या मतांवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मतमोजणी पडताळणीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. मात्र, युगेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती विधानसभा निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना मतपडताळणी करू नका, असे मी सांगितले होते. ते एकाच उमेदवाराबाबत होते. खडकवासल्याचे उमेदवार सचिन दोडके यांच्याशीही मी चर्चा केली होती. मी स्वत: चारवेळा ईव्हीएमवर निवडून आले आहे. त्यामुळे त्यात घोटाळा आहे, असे मी कसे म्हणू शकेन.
हेही वाचा – ‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अनेक ठिकाणी लोकांचे म्हणणे आहे की, त्यांची मते दुसरीकडे गेली आहेत. त्यामुळे सरकार पारदर्शीपणे काम करत असेल तर, ‘ईव्हीएम’ काय किंवा ‘बॅलेट’ पेपर वर निवडणूक घेण्यास सरकारला काय अडचण आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.





