उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळीला मदत, डॉक्टरांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Eknath Shinde | भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. क्रिकेटपटू विनोद कांबळीला एकनाथ शिंदेंनी मदत जाहीर केली आहे. एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन विनोद कांबळीची चौकशी केली. तसंच आकृती रुग्णलायच्या डॉक्टरांशीचर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली.
विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पुढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘बीआरटी’तील घुसखोरी ३९ हजार चालकांना भोवली; ११ महिन्यांत ३ कोटी ७१ लाखाचा दंड वसूल
राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळीने कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.




