काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा यांचे निधन
अनेक दिवसांपासून ते आजारी ,प्रियांक खर्गे यांनी व्यक्त केले दु:ख
बंगळुरू : माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा यांच मंगळवारी (10 डिसेंबर )निधन झालं. बंगळुरू येथील निवासस्थानी मंगळवारी 2.45 च्या सुमारासा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला.
एसएम कृष्णा यांनी 11 ऑक्टोबर 1999 ते 20 में 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्याव्यतिरिक्त 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 दरम्यान ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
प्रियांक खर्गे यांच्याकडून दु:ख व्यक्त
एसएम कृष्णा यांच्या निधनाबद्दल समजातच प्रियांक खर्गे यांनी दु:ख व्यक्त केले. श्री एस एम कृष्णा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. मुख्यमंत्री आणि नेते म्हणून त्यांनी राज्य आणि राष्ट्रावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाने कर्नाटकच्या प्रगतीला आकार दिला आणि बंगळुरूमध्ये त्यांच्या कॉर्पोरेट दृष्टिकोनामुळे त्यांना ओळख मिळाली, ते अनेक लोकांचे प्रिय बनले. बंगळुरूला जागतिक शहर म्हणून प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा लाभ आपण अजूनही घेत आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे योगदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहो.अशा शब्दांत प्रियांक खर्गे यांनी श्रद्धांजली वाहिली.





