ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महाराष्ट्र हरलास तू…’, तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत

विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल

मुंबई : २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. कलानुसार महायुती 231 जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 128 जागांवर विजय मिळवला आहे. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा मात्र दारुण पराभव झाला आहे. राज ठाकरेंच्या मनसेला २०२४ च्या निवडणुकीत एकही खातं उघडता आलेलं नाही. यामुळे राजकीय आणि मनोरंजन विश्वात अनेक चर्चे रंगल्या आहेत.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील मनसेचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने ‘महाराष्ट्र हरलास तू…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील तेजस्विनीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

तेजस्विनी पंडित एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हणाली, विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१००, पण तरीही राजसाहेब ठाकरे आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू असं म्हणत अभिनेत्री #एकनिष्ठ #सदैवसोबत अशा हॅशटॅगचा देखील पोस्टमध्ये वापर केला आहे.

सांगायचं झालं तर, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणार मनसेचे 125 उमेदवार रिंगणात होते. पण मनसेला एकही जागेवर विजय मिळालेला नाही. निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर अवघ्या तीन अक्षरांत प्रतिक्रिया दिली आहे. “अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा देखील दारुण पराभव झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button