ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मतदानाला जाण्यापूर्वी 95 टक्केउमेदवारांनी घेतले देवदर्शन

कुटुंबाकडून औक्षणही करण्यात आले.अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

महाराष्ट्र : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवारांनी देवदर्शन करत मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी त्यांचे कुटुंबाकडून औक्षणही करण्यात आले.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी मतदानापूर्वी मुंबादेवीचे दर्शन घेतलं आहे. शायना एनसी या शिवसेना शिंदे गटाकडून मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. मतदानापूर्वी शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना करण्यात आली. तर दुसरीकडे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी अजय चौधरी यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यासोबतच मुंबईतील माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांचं पत्नीकडून औक्षण करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी महेश सावंत यांचे औक्षण करण्यात आले. त्यासोबत महेश सावंत यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

लातूरचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांनी मतदानापूर्वी वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समाधी स्थळावर जाऊन वंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आईचा आशीर्वाद घेतला. त्यासोबतच वांद्रे पूर्व मतदारसंघाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी विलेपार्ल्यातील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेतले. तसेच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुलगा मानससह वरोरा येथील टिळक विद्यालयात मतदान केले. मानस धानोरकर याचं पहिल्यांदाच मतदान करत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार होण्यासाठी मानसचा एक दिवस कमी पडला होता. वडील गेल्यानंतर ज्या मामाने आमची काळजी घेतली त्याच्यासाठी मतदान करत असल्याचा आनंद मानसने व्यक्त केला. तर प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेप्रमाणेच काँग्रेसची लाट कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button