Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘पांडुरंगासोबत माझं डायरेक्ट कनेक्शन, आर. आर. आबांचं स्वप्न…’; सांगलीच्या सभेत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघाचे, महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची प्रचार सभा होत आहे. सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली. मला आर आर पाटील यांच स्वप्न पूर्ण करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार हे वैभव दादा यांच्या सोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे नंतर हे चिन्ह उद्धव ठाकरे यांचं आहे. दिल्लीची वाकडी नजर महाराष्ट्रवर नेहमी आहे. पोलीस संवाद आबांच्या मुळे पोलीस भरती पारदशर्क केली. आता देवभाऊने आबा नंतर एकही मोठी पोलीस भरती झाली नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकसभेला लाडकी बहीण झाली आहे. पण या सरकारला नात्याची किंमत कळली नाही. नात्याला एवढी पंधराशे किमीत दिली. माझ्यावर टीका करतात. हो माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला. माझ्या हातात सहा बांगड्या माझ्या आईच्या आहेत आणि शरद पवार तुपाचे आहेत. माझा सोन्याचा चमचा हा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा     –      मिशन विधानसभा : ‘निवडणूक अजेंडा’ महाविकास आघाडीपेक्षा महायुती ‘पॉवर फुल’ 

माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. त्याच्याशी डायरेक्ट कनेक्शन आहे. मी त्यांनाच विचारून भाषण काय करू विचारते आणि भाषण करते. स्वच्छतेविषयी बोलताना मी त्या देवा भाऊंसारखं कॉपी करणार नाही.काम करायचे असेल तर मन मोठं लागतं. महागाई आणि बेरोजगारला आम्ही कंटाळलो आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला असा गृहमंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन उभा राहतो. माझी लढाई कोणाशी वैयक्तिक नाही माझी लढाई वैचारिक अशी आहे. तुम्ही जर बेरोजगारी महागाई वाढवली तर त्याच्याशी माझी लढाई आहे. लाडकी बहीण आहेच पण ती महालक्ष्मी आहे आणि 3 हजार तिला देऊ. सत्ता सत्ता काय असते. तुम्हाला हमीभाव देण्यासाठी सत्ता मागते. तुम्हाला साधन देण्यासाठी सत्ता मागते. विरोधक येतील आणि देतील, दोन्ही हाताने घ्या. मी चहा देईन. ते जे देतात ते त्याचे नाही तुमचेच आहेत. पण तुमच्या मनात जे आहे ते करा. कारण 50 खोके नॉट ओके…. हे गलिच्छ राजकारण दुर्देवी आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button