हडपसर मतदारसंघात 147 मतदान केंद्रे स्थलांतरित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Woman-journalist-threatened-with-death-by-candidates-relatives-3-780x470.jpg)
पुणे : मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने हडपसर विधानसभा मतदारसंघातील १४७ मतदान केंद्रे स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्याबाबत जुन्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. मतदारांनी हा बदल लक्षात घेऊन स्थलांतरित नवीन ठिकाणच्या केंद्रावर मतदान करण्याचे आवाहन, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी केले आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघात एकूण ५३२ मतदान केंद्रे आहेत. मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सुसुत्रीकरणांतर्गत खुल्या जागेतील तात्पुरत्या पत्राशेडमध्ये असलेली १४७ केंद्रे शंभर ते पाचशे मीटर अंतरावरील पक्क्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत.
हेही वाचा – ‘भोसरीतील विराट सभा परिवर्तनाचे प्रतीक’; अजित गव्हाणे
बदल झालेल्या मतदान केंद्राचा तपशील ‘voter helpline app’ आणि ‘https://electroalsearch.eci.gov.in‘ या साईटवर ‘Know Your Polling Station’ यामध्ये पाहता येईल तसेच सोबत दिलेला किंवा आर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून ठिकाणात बदल झालेल्या मतदान केंद्राचा सविस्तर तपशील उपलब्ध करून घेता येईल. तेव्हा मतदारांनी या सुविधांचा वापर करून स्थलांतरित नवीन ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोरे यांनी सांगितले.