दौंड विधानसभा मतदारसंघात १ हजार ३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड | दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या १ हजार ३ अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘यांचा दिवटा पडला तरच काहीतरी चांगलं होईल’; उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका
विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून नमुना १२ भरुन घेण्यात आले होते. टपाली मतदानाकरीता संत तुकडोजी विद्यालय एकूण ३ टपाली मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली. यावेळी निवडणुक कर्तव्यावर असलेल्या १ हजार ३ अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४०८ पोलीस कर्मचारी सहभागी होते. टपाला मतदान प्रक्रियेकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे, टपाली मतदान नोडल अधिकारी दिनेश अडसूळ व सहायक पोपट कुंभार यांनी नियोजन केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली.





